श्रीरामपुर/प्रतिनिधी (संदिप आसने) :- महसूल दिनानिमित्त येथील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात श्रीरामपूर उपविभागातील महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ पार पडला. या सत्कार समारंभास उपविभागीय अधिकारी अनिल पवार, राहुरीचे प्रशिक्षणार्थी प्रांतअधिकारी सदानंद जगताप, श्रीरामपूरचे तहसलिदार प्रशांत पाटील, राहुरीचे तहसीलदार फसूद्दीन शेख यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

तलाठी राजेश घोरपडे, बाबासाहेब कदम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. व प्रास्ताविकात त्यांनी महसूल दिनाची माहिती सांगून त्याचे महत्व विषद केले. राहुरीचे नायब तहसिलदार जी एस तळेकर, श्रीरामपूरच्या नायब तहसीलदार ज्योती गुंजाळ, दीपक गोवर्धने अव्वल कारकून, मंडळ अधिकारी तसेच तलाठी व अन्य अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले अहमदनगर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन नुकताच सत्कार करण्यात आला होता.

श्रीरामपूर उपविभागात कार्यरत सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात, लोकसभा व विधानसभा निवडणूक, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करुन त्यांना वेळेवर मदत देणे,अनुलोम अभियान व इतर कार्यामध्ये सहकार्य करुन योगदान दिल्यामुळेच प्राथमिक स्वरुपात श्रीरामपूर उपविभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना गौरविण्यात आले असल्याचे उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी सांगितले.

आमचा गौरव म्हणजेच उपविभागात कार्यरत सर्वांचा गौरव असल्याचे प्रसंशउदगार श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांनी काढले. तसेच भविष्यात सर्वांकडून असेच सहकार्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. दिलेल्या उद्दिष्टाची पूर्तता करणाऱ्या महसूल यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, तसेच त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी दरवर्षी १ ऑगस्टला महसूल दिन साजरा केला जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील, राहुरीचे तहसीलदार फसूद्दीन शेख, श्रीरामपूरचे नायब तहसीलदार दीपक गोवर्धने,राहुरीचे नायब तहसीलदार जी एस तळेकर, मंडल अधिकारी बी बी गोसावी, तेजपाल शिंदे, अव्वल कारकून योगेश भालेकर, श्रीमती अभया राजवाळ, देशमुख चांद, श्रीमती मगरे सि व्ही, तलाठी सतीश पाडळकर, श्रीमती तेजल सोनवणे, लिपिक संदिप काळे, एन एस सोनसळे, राहुल जाधव, शिपाई राजू निकाळे, अशोक बर्डे, कोतवाल राजू साळुंके, आर पी खामकर, पोलीस पाटील संजय आदिक, दादासाहेब पवार, वाहन चालक ज्ञानेश्वर राऊत, संदिप पाळंदे या अधिकारी कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here