श्रीरामपूर/प्रतिनिधी(संदिप आसने) :- बेलापूर रोड शिवरस्ता चे अतिक्रमण काढून  मिळणे नियमानुसार शिवरस्त्याची हद्द कायम करून मिळावी अशी मागणी छावा संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बेलापूर-श्रीरामपूर शिवरस्ता पूर्णपणे अतिक्रमण होऊन लगतच्या शेतकऱ्यांच्या मालकी हक्कच्या जमिनीकडे वहिवाट झाला आहे. त्यावर आता नगरपालिका अंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण कामे (२०१९-२०) अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता मजबुतीकरण व डांबरी करणासाठी कार्यरंब आदेश दिला आहे. परंतु सदर रस्ता अतिक्रमनात गेला असून आता जे दिसतंय ती वहिवाट जशी पडली तसा  बांधकाम विभागाने कामा साठी घेतला आहे. तो मूळ नकाशा प्रमाणे होण्यासाठी आमची या निवेदनाद्वारे आपल्याकडे विनंती आहे की सदर रस्त्याचे काम शिवरस्ता हद्द अतिक्रमण मुक्त करून मूळ नकाशा प्रमाणे दाखवून द्यावा व त्यावरती मजबुतीकरण डांबरीकरण करण्यासाठी परवानगी द्यावी ही विनंती तसे बांधकाम विभागाला काम थांबवण्याचे आदेश द्यावे अन्यथा अखिल भारतीय छावा संघटनेच्या माध्यमातून लगतचे शेतकरी या रस्त्याच्या प्रश्नी तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा पटारे यांनी दिला आहे.

निवेदनावर नितीन पटारे (जिल्हा अध्यक्ष), शरद बोंबले (शहर अध्यक्ष), प्रवीण देवकर (जिल्हा सरचिटणीस), देविदास बोबले यांची नावे आहेत. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, प्रांतअधिकारी, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम, मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपरिषद श्रीरामपूर आदींना पाठविल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here