श्रीरामपुर/प्रतिनिधी :-  कोरोना संदर्भात मा जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार ७ ते ४ या वेळेच्या पूर्वी व नंतर व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडी ठेवल्यास व मंगल कार्यालयात तसेच हॉटेल हे कोरोना नियमांचे पालन न केल्यास आज पासून व्यापाऱ्यांवर व मंगल कार्यालय तसेच हॉटेल मालकावर  कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा उपविभागीय अधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिला आहे . आज गुरुवार दिनांक ०५ ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे, पोलिस निरीक्षक संजय सानप यांनी श्रीरामपुर शहरातील दुपारी ४ नंतर सुरू असणाऱ्या व्यापाऱ्यांना व दुकानदारांना तसेच मंगल कार्यालय मालकाना प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे अन्यथा कारवाई केली जाईल अशा सक्त सूचना दिल्या आहेत . या प्रसंगी उपविभागीय अधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे व श्रीरामपुर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय सानप उपस्थित होते .

कोरोना या महामारी मुळे अनेकांनी आपला जिव गमाविला आहे . आज ही अनेकजण जीवन मृत्यूशी झुंज देत आहेत .या विषाणु रोखण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलिस, नगरपालिका, महसूल प्रशासन , राजकीय पदाधिकारी , पत्रकार, व्यापारी व नागरिकांनी सर्वांनी मिळून या पूर्वीच्या काळामध्ये चांगला लढा दिला आहे . हा लढा संपलेला नसून , तिसरी लाट समोर आहे . पुन्हा एकदा नव्याने रुग्ण संख्या मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे . यामुळे सदर चा लढा यापुढेही सुरूच ठेवण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत . यामध्ये मास्क , सोशल डिस्टन्स , सॅनिटायझर या सर्व गोष्टींचा वापर व नियम पाळणे बंधनकारक आहे . तसेच ही प्रत्येक जबाबदार नागरिकांचे कर्तव्य आहे . परंतु कर्तव्याचे पालन करताना काही व्यापाऱ्यांकडून याबाबत दक्षता घेतली जात नाही . जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या वेळेच्या नंतर ही श्रीरामपुर शहरातील अनेक दुकाने व्यापारी उघडून ठेवतात . यामुळे पुन्हा एकदा शहरांमध्ये व्यापाऱ्यांकडून नियमांची पायमल्ली होत असल्याने प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन व्हावे . तसेच आगामी विषाणू चे संकट वेळेतच रोखण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन होणे गरजेचे असून , मा . जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार ७ ते ४ या वेळेच्या पूर्वी व नंतर व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडी ठेवल्यास , व कोरोना नियमांचे पालन न केल्यास आज पासून व्यापाऱ्यांवर व हॉटेल व मंगल कार्यालयावर कोरोना संपेपर्यंत सील करून त्याचा विरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा उपविभागीय अधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिला आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here