श्रीरामपूर : शहरातील शिवाजी चौकात येथे आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त लावण्यात आलेला फलक फाटल्याने, मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. महापुरुषांच्या फलकाची विटंबना झाल्याची वार्ता कळताच मागासवर्गीय समाजातील संघटनेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी जमून घटनेचा निषेध नोंदवला तसेच महापुरुषांच्या फलक असतांना देखील त्यावर जाणून बुजून नगराध्यक्षांच्या वाढदिवसाचा फलक लावण्यात आला. त्यामुळे महापुरुषांच्या फलकाची विटंबना झाली असून. वाढदिवसाचा फलकावर ज्यांचे ज्यांचे फोटो आहेत त्यांच्यावर अट्रोसिटी कायद्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा.

तसेच श्रीरामपूर पालिकेने या घटनेची जाहीर रित्या माफी मागावी अशी मागणी विविध संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. सदरची घटना ही नजर चुकीने झाल्याने या विषयाचे राजकारण होऊ नये याकरिता सत्ताधारी नगरसेवक तसेच अनेक मान्यवरांनी मध्यस्थी घालून दोन्ही बोर्ड काढून घेतले यावेळी वाढता तणाव पाहता पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी जमा झालेल्या आंदोलनकर्त्यांना फलकावरील लोकांवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्याने वातावरण निवळले मात्र जर संबंधितांवर गुन्हा दाखल न झाल्यास रिपाईच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here