श्रीरामपुर/प्रतिनिधी :- कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे. नुकतेच प्रशासनाने निर्बंध आणखी कडक केले आहेत. दुपारी 4 वाजेनंतर दुकाने उघडी ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे.

त्यांतरही दुकाने उघडी असल्यास संबंधित दुकाने सील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिलेबआहेत. या पार्श्वभुमीवर महसूल अधिकारी, पोलीस व नगरपालिका प्रशासनाने तीन दिवसांपासून कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. कोरोना काळात जिल्हाधिकाऱ्याचा आदेश डावलत दुकाने सुरू ठेवणाऱ्या दुकानांविरोधात महसूल पोलीस व नगरपालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत तीन दिवसांत 30 दुकाने सील केली.

तसेच बेलापुरातील पाच दुकानांवर तर श्रीरामपुर शहरातील सहा दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस निरीक्षक संजय सानप व नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दुपारी 4 वाजेनंतर उघडी असलेल्या दुकानांवर कारवाई करण्यासाठी पथके नियुक्त केली आहेत. या पथकाने तीन दिवसांत 30 दुकानांना सील ठोकले आहे. या शिवाय शहरात विनामास्क फिरणाऱ्या दुचाकीस्वार व नागरिकांवरही प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे.

तीन दिवसात अशा सुमारे 70 हून अधिक नागरिकांकडून दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय सानप यांनी दिली.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात येत असून जिल्हाधिकारी यांचा पुढील आदेश येईपर्यंत दुकाने सील राहतील, नागरिकांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, मास्क, सॅनिटायझर तसेच सोशल डिस्टंन्सिंगचा वामर करावा, असे आवाहन मुख्याधिंकारी गणेश शिंदे यांनी केले आहे.

दरम्यान बेलापूर येथील चिंकन शॉप हे दुपारी चार नंतरही सुरु असल्याचे व वारवार सांगूनही चार नंतर दुकान सुरुच ठेवल्यामुळे लकी चिंकन सेंटर, गुडलक चिंकन सेंटर, डेली फ्रेश चिंकन सेंटर, ए नव चिंकन शॉप, सुपर चिकन शाँपही दुकाने शासनाने ठरवून दिलेल्या वेळे व्यतिरीक्त उघडी ठेवुन नियामाचा भंग केला जात असल्याचा अहवाल पोलिसांनी तहसील कार्यालय श्रीरामपूर येथे पाठविला होता. तससीलदार प्रशांत पाटील यांनी ही दुकाने तातडीने सिल करण्याचे आदेश मंडलाधिंकारी बाबासाहेब गोसावी यांना दिले. त्यानंतर मंडलाधिकारी बाबासाहेब गोसावी, कामगार तलाठी कैलास खाडे यांनी बेलापूर पोलिसांना सोबत घेवुन हे पाचही दुकाने सिल केली आहे. प्रशासनाच्या या कारवाहीमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here