श्रीरामपुर/प्रतिनिधी :- जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासासाठी व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वांगीण विकासात्मक कामे करण्यासाठी व जास्तीत जास्त निधी मिळवून गावोगावच्या कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांनी दिले.

जिल्हा परिषद सदस्या आशाताई बाबासाहेब दिघे यांच्या घरी भेट दिली त्याप्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला व दत्तनगर गावातील विविध विकास कामाबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली पुढील काळात तालुक्‍यातील दत्तनगर सह ग्रामीण भागांच्या विकासासाठी जो पण काही निधी लागेल तो जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देण्याचे आश्वासन घुले यांनी यावेळी दिले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या आशाताई दिघे, सरपंच सुनील शिरसाठ, उपसरपंच सारिका कुंकूलोळ खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष प्रेमचंद कुंकूलोळ यांनी दत्तनगर गावाच्या वतीने त्यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here