श्रीरामपूर  – कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने बाजार पेठेतील व्यापारी बंधूनी कोरोना नियमनाचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे, कोरोना नियमनाचे उल्लंघन करणारे ज्या व्यापाऱ्यांनी दुकाने प्रशासनाने सील केली आहेत, ती दुकाने सोमवार सायंकाळ पर्यंत पूर्ववत सुरु होण्यासाठी जिल्हाधिकारींशी चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी प्रयत्नशील राहील असे आश्वासन आमदार लहू कानडे यांनी दिले.

शासकीय प्रशासन, नगरपालिका व पोलीस अधिकारी यांनी गुरुवार, शुक्रवार व शनिवार या तीन दिवस बाजारपेठेत फिरुन कोरोना नियमनाचे उल्लंघन केल्याबद्दल सुमारे ३५ दुकाने सिल करण्याची कार्यवाही केली. कार्यवाहीमुळे व्यापारी वर्गात नाराजी असून काही दुकाने ४ वा. बंद झाली होती. परंतू शटर उघडून दुकानाचे मालक व कर्मचारी बाहेर पडताना त्यांच्यावर कार्यवाही दुकाने सील करण्यात आली. श्रीरामपूर मर्टन्टस् असोसिएशनचे अध्यक्ष विशाल पोफळे, उपाध्यक्ष उमेश अग्रवाल व संचालक मंडळाचे सदस्य व शहरातील व्यापारी यांनी आ.लहू कानडे यांची भेट घेऊन सील दुकाने पूर्ववत उघडण्यास परवानगी द्यावी व दुकाने बंद करण्याची ४ ची वेळ बदलून सायंकाळी ७ ची करावी या मागणीचे निवेदन आ.कानडे यांना दिले.

यावेळी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, तालुकाध्यक्ष अरुण पा. नाईक व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विशाल पोफळे, संचालक सुनिल गुप्ता, मुकेश कोठारी, उमेश अग्रवाल, विलास बोरावके, राहुल मुथ्था, राजेंद्र पानसरे, प्रेमचंद कुंकूलोळ, राजेश कासलीवाल, संजय कासलीवाल, राजेंद्र चोपडा, हाजी फिरोज मुसाणी, पारस लुक्कड, सिध्दार्थ छल्लाणी, महावीर पगारीया, निरज चंगेडिया, नितीन गदिया, व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष रमेश कोठारी, रमेश गुंदेचा, निलेश संघवी, फरीद मुस्कान, देवेंद्र पारख, सुभाष पोटे, अक्षय राठी, अमजद मुसानी, अभिजीत नौलाखा, प्रकाश बाफना, सचिन डंबीर, राजेश अलघ, मधुसुदन कासट, ॲड. समीन बागवान, सतीश बोर्डे, राजू औताडे, विष्णुपंत खंडागळे, महेबुब भाई आदी उपस्थित होते.

यावेळी आ.कानडे म्हणाले, कोरोना हा काय असतो हे मी स्वतः अनुभवले आहे. त्याचा त्रास सहन केला आहे. कोरोना महामारीत अनेक जणांना प्राण गमवावे लागले. कुटुंब उघड्यावर पडली. त्यांचे मनान दुःख सलत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे. नियमनाचे पालन करावे व तिसरी लाट येऊ देऊ नये, असे आवाहन करीत कोकण, कोल्हापूर, सातारा व सांगली परिसरात पुरामुळे मोठी हानी झाली आहे. पुरग्रस्तांना मदतीची मोठी गरज आहे. ही मदत उभारण्यासाठी मर्चन्टस् असोसिएशनने पुढाकार घ्यावा, या कामात राजकारण न करता काम करावे असे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here