माळवाडगाव/प्रतिनिधी(संदिप आसने) :- कुठल्याही संस्थेत सेवा करताना ती प्रामाणिकपणे केली तर अशा व्यक्तीचा सन्मान हा करावाच लागतो, असे विचार अशोक सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेब आदिक यांनी माळवाडगाव येथे एका सत्कार समारंभात मांडले.
       
अहमदनगर जिल्हा सहकारी बँक शाखा माळवाडगाव येथील शाखा व्यवस्थापक रमेश पटारे यांची माळवाडगाव येथील शाखेतून बेलापूर बुद्रुक येथे बदली झाल्याने त्यांचा माळवाडगांव, भामठान, मुठेवाडगाव व खानापूर विविध सेवा सहकारी संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संचालक बाबासाहेब आदिक बोलत होते,यावेळी अशोकचे माजी संचालक सारंगधर आसने,ज्येष्ठ सभासद अंबादास आदिक यांच्या प्रमुख उपस्थितीत गंगाधर बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली साध्या पद्धतीने हा सत्कार समारंभ संपन्न झाला.
     
यावेळी माळवाडगाव तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुदामराव आसने, उपाध्यक्ष नानासाहेब आसने, भामाठाण सेवा संस्थेचे चेअरमन विजू बनसोडे, मुठेवाडगाव सेवा संस्थेचे चेअरमन शिवाजी मुठे आदी प्रमुख यावेळी उपस्थित होते. अंबादास आदिक, सोपानराव आसने, मुख्य सचिव रमेश जाधव यांच्यासह विविध संस्थेच्या माध्यमातून शाखा व्यवस्थापक रमेश पटारे यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. पटारे यांनी सर्वसामान्य शेतकरी सभासदांची सेवा प्रामाणिकपणे केली. प्रामाणिक सेवा आज अतिमहत्त्वाची आहे असे मनोगत संचालक बाबासाहेब आदिक यांनी व्यक्त केले. पटारे आपल्या गावाचे भाचे असल्याने गावाचे पाहुणे म्हणून त्यांनी पाहुण्याप्रमाणे त्यांनी बँकेत उत्तम प्रकारे सेवा केली असे पत्रकार विठ्ठलराव आसने यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. 
        
  या समारंभास उत्तमराव बनसोडे, नितिन बनसोडे, राजेंद्र आदिक, भास्करराव आसने, योगेश आसने, फेडमन भाऊसाहेब आसने, नानासाहेब मुठे, बाळासाहेब आसने, कचरू बनसोडे, भानुदास शिंदे,श्रीधर आदिक, मच्छिंद्र दळे, रावसाहेब आसने, कॅशियर सचिन गवारे,संतोष थोरात,मुख्य सचिव रमेश जाधव,प्रदीप आसने,भाऊसाहेब आसने, दत्तात्रय जासूद, किरण मुठे, विलास खैरे, अनिल ठाकरे, विष्णुपंत ठाकरे, सुभाष मुठे,शिवाजी मुठे,विठ्ठल बोर्डे,भागवतराव मुठे, पत्रकार विठ्ठलराव आसने,भाऊसाहेब काळे,संदिप आसने, इम्रान शेख सह मान्यवर उपस्थित होते.पत्रकार विठ्ठलराव आसने यांनी समारंभाचे सूत्रसंचालन केले तर संचालक बाबासाहेब आदिक यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here