श्रीरामपूर : लोकशाहित जनता आणि प्रशासन यांच्यात सुसंवाद व परस्पर सहकार्य असेल तर चांगले काम घडते असा अनुभव आहे. तालुक्याचे तहसीलदार श्री.प्रशांत पाटील यांनी हेच भान राखून लोकाभिमुख काम केल्यानेच त्यांच्या कामाचा उत्कृष्ट तहसीलदार म्हणून गौरव झाल्याचे प्रतिपादन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.

          तालुक्याचे तहसीलदार श्री.प्रशांत पाटील यांना महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट तहसीलदार म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा लोकसेवा विकास आघाडी व अशोक सहकारी बँकेच्या वतीने श्री.मुरकुटे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यानिमित्त श्री.मुरकुटे बोलत होते. यावेळी माजी नगरसेविका सौ.मंजुश्री मुरकुटे, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ, अशोक कारखान्याचे चेअरमन भाऊसाहेब कहांडळ, व्हा.चेअरमन पोपटराव जाधव, अशोक बँकेचे व्हा. चेअरमन ऍड.सुभाष चौधरी, संचालक नाना पाटील, ऍड.उमेश लटमाळे, अशोक मिल्कचे चेअरमन श्रीधर कोलते, माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब मुळे, शिवसंकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोहन डावखर, आदि मान्यवर उपस्थित होते.

श्री.मुरकुटे म्हणाले की, शासकीय अधिकारी हे जनता व शासन यांच्यातील दुवा असतो. याचे भान ठेवून अधिका-यांनी काम केल्यास जनतेचे प्रश्न मार्गी लागतात. यासाठी लोकप्रतिनिधी, जनता व प्रशासन यांच्यात सुसंवाद आवश्यक असतो. श्री.पाटील यांनी जनतेशी नाळ जोडून त्यांच्याशी संवाद राखल्याने त्यांचेकडून लोकाभिमुख काम होत असल्याचे श्री.मुरकुटे म्हणाले. 

सत्कारास उत्तर देताना तहसीलदार यांनी श्री.मुरकुटे यांचे मताशी सहमती दर्शविली. आपल्याला जनतेचे चांगले सहकार्य लाभले. याला सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याची जोड लाभली. यामुळेच आपल्याला जनतेचे प्रश्न सोडविता आले याचे समाधान वाटते. माजी आ.श्री.मुरकुटे यांचे विचार प्रेरणादायी असून त्यानुसार काम केल्यास लोकशाहिचा उद्देश सफल होईल. आपल्याला मिळालेला पुरस्कार हा या तालुक्यातील जनतेचा सन्मान असल्याचे श्री.पाटील म्हणाले.

 कार्यक्रमास खादी ग्रामोद्योग संघाचे व्हा. चेअरमन प्रविण फरगडे, राहुल बनकर, अनिल कुलकर्णी, संदीप डावखर, भगवान सोनवणे, सौ.शालिनी कोलते, साजिद मिर्झा, प्रमोद करंडे, वैभव सुरडकर, नदीम बागवान, संजय कासलीवाल, नवाब शेख, अतुल शेळके, जयेश परमार, नाना गोर्डे यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here