श्रीरामपुर/प्रतिनिधी :- श्रीरामपुरातील नावाजलेल्या सोन्या चांदीचे प्रतिष्ठित व्यापारी सचिन महाले व अमोल महाले यांच्या महाले पोदार लर्न स्कूल आणि महाले कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने नुकताच अहमदनगर जिल्ह्यात उत्कृष्ट तहसिलदार मिळालेल्या श्रीरामपूरचे विद्यमान तहसीलदार श्री प्रशांतजी पाटील साहेब यांचा शाळेच्या वतीने  सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेच्या प्राचार्या सौ श्वेता गुलाटी दंड व सूत्रसंचालन श्रीमती वर्षा आगाशे, यांनी केले तर सत्कारमूर्ती तहसीलदार प्रशांत पाटील यांचा सत्कार महाले प्रतिष्ठानचे संचालक चि. ओम महाले यांच्या हस्ते करण्यात आला तर आभार प्रदर्शन सौ शारदा जोंधळे यांनी केले.

यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील यांनी मुलांशी ऑनलाइन पद्धतीने हितगुज साधत त्यांना सरळ आणि सोपी जीवनशैलीचे मार्गदर्शन केले, या कार्यक्रमाचा मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी कोरोना प्रादुर्भावाचा परिपूर्ण पालन करून घरूनच आनंद घेतला. साहेबांच्या या उत्कृष्ट कार्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री सचिन महाले सर आणि सचिव श्री अमोल महाले सर यांनी ही शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन शाळेचे व्यवस्थापक श्री अभिजीत खरात आणि श्री गौरव गवारे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here