श्रीरामपुर/प्रतिनिधी :- भारतीय जैन संघटना श्रीरामपुर व श्रीरामपुर तालुका मेडिकल अँड ड्रॅगिस्ट असो यांच्या संयुक्त विद्यमाने व प आनंदऋषीजी ब्लड बँक अहमदनगर यांच्या सहकार्याने १५ ऑगस्ट स्वतंत्र दिन प पु आचार्य आनंदऋषीजी म सा जन्म जयंती सप्ताह प पु १०८ देवनंदजी म सा यांचा जन्म दिन व भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री शांतीलालजी मुथा यांच्या वाढदिवसा निमित्त दादा वामन जोशी (नविन मराठी शाळा) श्रीरामपुर येथे सकाळी १०.३० ते ३.३० वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

जैन संत प पु पदमऋषीजी म सा व प पु अचलऋषीजी म सा यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराची सुरुवात झाली भारतीय जैन संघटनेच्या सर्व कार्यक्रमाबाबत मनसुख चोरडिया यांनी माहिती दिली तर श्री सुरेशचंदजी बाठिया यांनी कोरोना काळात रक्ताची गरज व संपूर्ण कार्यक्रमाचे प्रयोजन सांगितले अवयव दान, नेत्रदान व देहदान याबाबतीत संघटनेने चालवलेली मोहीमेचे महत्त्व व माहिती गौतम साबद्रा यांनी सर्वाना सांगितले.

शिबिरामध्ये ऐकूण ३८ बॅग रक्त संकलित करण्यात आले या कामी संघटनेचे डॉ सतिष कोठारी, संजय कासलीवाल, महावीर कोठारी व आनंदऋषीजी ब्लड बँकेचे महानोर व त्यांच्या सर्व स्टाफ ने यांच्या योग्य नियोजन केले होते

सदर कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट तहसिलदार पुरस्कार प्राप्त प्रशांत पाटील यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास अशोक बँकेचे चेरमन लोकनेते भानुदास मुरकुटे, हिम्मतराव धुमाळ, श्रीरामपुर मा. आ. लहुजी कानडे, सचिन गुजर, ज्ञानेश्वर मुरकुटे, अरुण पा.नाईक,शिवसेना नेते अशोक थोरे, मराठा संघाचे जाधव, लासुरे नाना,  यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या

कार्यक्रमामध्ये श्रीरामपुर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी सदिच्छा भेट देऊन रक्तदान केले व कार्यक्रमात सहभाग नोंदवला

कार्यक्रमाला जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल हिंद सेवा मंडळाचे पदाधिकारी मानद सचिव संजय जोशी, अशोक श्रीरसागर, संगम, संजय छल्लारे, अशोक उपाध्ये, पुरूषोत्तम मुळे यांचा सत्कार करण्यात आला

या कार्यक्रमास जेष्ठ पत्रकार रमेश कोठारी व अनिल पांडे यांनी मार्गदर्शन केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here