श्रीरामपूर(प्रतिनिधी)- शहरातील वॉर्ड नं.७ येथील पटेल हायस्कुल परिसरालगत असलेल्या विद्याविहार शिक्षक कॉलनीमध्ये सशस्त्र दरोडा पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सविस्तर वृत्त असे की, बेलापूर येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयात कार्यरत असलेले प्राध्यापक विठ्ठल बाबासाहेब सदाफुले यांच्या घरी काल मध्यरात्री ३ वाजेच्या दरम्यान १०-१२ चोरट्यांनी दरोडा टाकुन घरातील ऐवज लुटुन नेला. ऐनतपुर शिवारातील श्रीरामपूर शहरालगत वॉर्ड नंबर पाच मधील बोंबले वस्ती येथे शिक्षक कॉलनी येथे ही घटना घडली.
विशेष म्हणजे येथे त्यांच्या आजूबाजूला लोकवस्ती आहे. काल मध्यरात्री त्यांच्या बंगल्याच्या मागील बाजूचे गेट तोडुन चोरट्यांनी किचन मधुन घरात प्रवेश केला. यावेळी घरात ते त्यांच्या पत्नी, दोन मुली, एक मुलगा असे पाच जण होते. घरात प्रवेश करताचत चोरट्यांनी प्रा. सदाफुले यांच्या गळ्याला चाकू लाऊन आम्हाला विरोध केला तर चिरून टाकण्याची धमकी दिली. शस्त्राचा धाक दाखवुन दहशत निर्माण केली. त्यानंतर घरात उचकापाचक करुन हाती लागेल तो ऐवज लुटून नेला.यावेळी त्यांच्या पत्नीने धाडस दाखवीत चोरट्यांचा मराठीतून शिवीगाळ करुन विरोध केला. त्यावर चोरटे त्यांच्याशी बहेनजी, बहेनजी.. असे बोलुन संवाद साधत होते. त्यात दहा तोळे सोन्याचे दागिने, लॅपटॉप यांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.
श्रीरामपूर शहरातील पटेल हायस्कुल शेजारील विद्याविहार शिक्षक कॉलनीमध्ये प्रा.सदाफुले सर यांच्या घरी १० ते १५ चोरट्यांनी आज पहाटे ३ च्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकला. काही लाखांचा ऐवज लुटल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. घराच्या जिन्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करत सदाफुले कुटुंबियांना चाकूचा धाक दाखवत लुटल्याची माहिती मिळाली.
गजबजलेल्या लोकवस्तीत दरोडा पडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. शहर व तालुका पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक सानप साहेब यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे. यावेळी परिसराच्या नगरसेविका स्नेहल खोरे, मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांच्यासह विद्याविहार शिक्षक कॉलनीच्या नागरिकांनी सदाफुले कुटुंबियांना धीर देत दरोड्याचा तपास लवकरात लवकर लागावा ही मागणी पोलिसांकडे केली.