नेवासा – नेवासा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची जनतेपेक्षा अवैधधंदे करणाऱ्यांची जास्त काळजी आहे. शासनाकडून कोरोनाच्या या महामारीत प्रशासनाला सर्व अधिकार दिले व जनतेची कशी काळजी घेता येईल यासाठी सर्व सूचना पण दिल्या आहे. तरीही नेवाशाच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी हे सर्वसामान्य जनता व व्यापाऱ्यांनाकडे दुर्लक्ष करत आहे.तर दुसरीकडे अवैध व्यवसाय करणाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. अशीच काही एक संभाषण ऑडिओ क्लिप नेवासा पोलिस स्टेशनचे अधिकारी व अवैध व्यवसाय करणाऱ्याशी फोनवर बोलताना तालुक्यातील जनतेकडे सोशल मीडिया व्हाट्सअप व फेसबुकवर वायरल झाली आहे.

यावरून एकच दिसते, की प्रशासनाला फक्त अवैध व्यवसायिक करणाऱ्यांचे हीत जपत आहे. आता या वायरल झालेल्या संभाषण ऑडिओ क्लिप मुळे तालुक्यातील सर्व जनतेकडून भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

उघडपणे वाळुतस्करांवर कारवाई होण्याअगोदरच निघुन जाण्यास सांगणाऱ्या पोलिस  अधिकाऱ्याला सर्वसामान्य नेवासकरांवर कायदा लागू करण्याचा अधिकार तरी आहे का? हा पोलिस होण्याअगोदर घेतलेल्या शपथेचा अवमान नाही का? देशहितासाठी हे अधिकारी धोकादायक आहेत.उद्या यांची मुंबईत पोस्टींग झाली तर हे पैशांसाठी बॉम्बस्फोटही करायला बसले, आता यातुन सुटण्यासाठी संभाषण क्लिप मधील आवाज माझा नाही हे म्हणु नका. सर्वांना माहीत आहेच की तुमचं डिपार्टमेंट तुमच्यावर काय कारवाई करणार आहे ते? पण जनतेच्या कोर्टात तर तुमचा बुरखा फाटला आहेच.

या संभाषण ऑडिओ क्लिपची तक्रार जिल्हाधिकार्‍यांकडे करून कारवाई करण्यासंदर्भात वंचित बहुजन आघाडी तर्फे मागणी करण्यात येणार आहे. संजय सुखधान. युवा नेते वंचित बहुजन आघाडी.

नेवासा तालुक्यातील नेवासा पोलीस स्टेशनचे अधिकारी हे सर्वसामान्य व्यापाऱ्यांची दुकाने चार ला बंद करायला लावतात. वेळ पडली तर सील ही करतात आणि दुसरीकडे अवैधधंदे करणार्‍या व्यवसायिकांना पळून जाण्याच्या पूर्वसूचना देतात.मग हा नेवासा पोलिस स्टेशनचा कसा न्याय आहे.सर्वसामान्य व्यापाऱ्यांना त्रास द्यायचा आणि अवैद्यधंदे करणाऱ्यांना सहकार्य करायचे.शासनाच्या निर्णयानुसार संध्याकाळी चार पर्यंत व्यापाऱ्यांना आपले व्यवसाय बंद करण्याची प्रशासनाकडून सांगण्यात येते.तर चार नंतर रात्री अकरा पर्यंत काही काही मोठमोठे व्यावसायिकांचे हॉटेल्स चालू राहतात. मग प्रशासनाला यांच्यावर कारवाई करता येत नाही का. मग कायदा काय फक्त सर्वसामान्य व्यापाऱ्यांनाच आहे का? आता या संभाषण क्लिपचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारकरून कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी तर्फे करणार आहोत. मनोज पारखे भाजप शहराध्यक्ष नेवासा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here