श्रीरामपूर/प्रतिनिधी : शहरातील राजकारण आता सोशल मीडियावर तापायला सुरवात झाली असून. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सोशल मीडिया युद्ध सुरू झालं आहे. या सर्वांच्या चालता ५ ऑगस्ट रोजी शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

या कार्यक्रमातील काही फोटो आणि व्हिडीओ सह तहसीलदारांसमोर मास्क लावा आणि लहान मुलांसोबत विनामास्क लावून वाढदिवस साजरा करतांना नियम आठवले नाही मग हा ढोंगीपणा कशाला अशा आशयाची पोस्ट एन एस यु आय चे शहराध्यक्ष सनी मंडलिक तसेच काँग्रेसच्या लोकांनी शेअर आणि पोस्ट केल्याने शहरातील विकास कामांपासून विचलित करण्यासाठी विरोधक जाणीवपूर्वक नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांची बदनामी करत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संबंधितांवर गुन्हा दाखल करावा याकरिता आज श्रीरामपुर शहर पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले

यावेळी नगराध्यक्षांची बदनामी थांबवा अन्यथा राष्ट्रवादी स्टाईलने उत्तर देऊ ,असा इशारा नगरसेवक राजेंद्र पवार व राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अलत्मश पटेल यांनी दिला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here