श्रीरामपूर – अखिल भारतीय छावा संघटनेचे अहमदनगर जिल्हाप्रमुख नितीन पटारे यांनी पोलिस उपअधीक्षक डॉ दिपाली काळे  यांना समक्ष भेट घेवून राहुरी परिसरात विचित्र मनोवृत्ती असलेला विजय आण्णासाहेब मकासरे हा तरुण मागासवर्गीय समाजातील असल्याचा धाक दाखवून अट्रोसिटी गुन्ह्याच्या नावा खाली अनेक सर्वसामान्य नागरिक तथा सरकारी कर्मचाऱ्यांना धमकावत असतो. या व्यक्तीवर पहिलेच विनयभंग, सरकारी कामात अडथळा या सह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

अ.भा.छावा संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा मराठा क्रांति मोर्चाचे समन्वयक देवेंद्र लांबे यांच्यावर केलेल्या हल्या संदर्भात चर्चा करून तात्काळ विजय मकासरे याला अटक करून जिल्हा बंदी करण्याची मागणी केली आहे. नितीन पटारे यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, अखिल भारतीय छावा संघटना संपूर्ण महाराष्ट्र भर खोट्या अट्रोसिटी गुन्ह्यांच्या विरोधात काम करत असतो. त्याच अनुषंगाने आमच्या संघटनेचे अहमदनगर जिल्हा कार्यध्यक्ष तथा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक देवेंद्र सिताराम लांबे  हे सामाजिक कार्यासोबत खोट्या अट्रोसिटी गुन्ह्यांच्या विरोधात आवाज उठवत असतात याचा राग मनात धरून राहुरी येथील विजय आण्णासाहेब मकासरे याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने शुक्रवार ६ ऑगस्ट २०२१ रोजी देवेंद्र लांबे यांच्या डोक्याला कट्टा लावून ,त्यांच्या खिशातील २५ हजार रुपये व एक सोन्याची अंगठी लंपास केली आहे. तसेच समाजाचे काम करू नये अन्यथा तुझ्यावर अट्रोसिटीचा गुन्हा व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देवेंद्र लांबे यांना दिली आहे. संबंधित मकासरे हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला व्यक्ती आहे. या व्यक्तीवर राहुरी पोलिस ठाण्यात देवेंद्र लांबे यांनी भादवि ३९२,३४१,५०४, ५०६,३४,३,२५ अंतर्गत गुन्हे दाखल केलेले आहे. यापूर्वी देखील मकासरे विजय अण्णासाहेब या इसमावर १) राहुरी पो.स्टे.२९७/२०१५ मु. पो. अॅक्ट ३७(१)(८)१३५, २)राहुरी पो.स्टे.१७४५/२०२० IPC ३५३,५०४,५०६ ३)श्रीरामपूर शहर ४८४/२०१९ IPC ३५३, ३३२, ३६८,२८३,१८८ ४) श्रीरामपूर १६१/२०१९ IPC ४२०,४९६,३४७,५०६,३४ ५)शिर्डी पो.स्टे.२६/२०१८ IPC ३७६, ४९५, ३२३,५०६ गुन्हे दाखल असून. अशा समाज विघातक मनोवृत्ती असणाऱ्या व्यक्तीला अहमदनगर, पुणे,नाशिक या जिल्ह्यातून तडीपार करून शस्त्र बंदी कायद्याचे उल्लंघन केले म्हणून मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे.

संबंधित प्रकरणातील विजय आण्णासाहेब मकासरे याच्यावर प्रशासनाकडून कारवाई न झाल्यास “छावा” च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल होणार्‍या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल असे निवेदनात म्हंटले आहे. निवेदन देण्यावेळी जिल्हा प्रमुख नितिन पटारे पाटील, शहर प्रमुख शरद बोंबले पाटील, बेलापूर शहराध्यक्ष दौलत गायकवाड, शेतकरी आघाडीचे निलेश बनकर, शहर उपाध्यक्ष मनोज होंड आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here