नाशिक : महाराष्ट्राभर गाजलेले शिर्डी येथील दुहेरी हत्याकांड प्रकरणी दोन तरूण रचित पाटणी व प्रवीण गोंदकर हे दुहेरी हत्याकांड मोठ्या प्रमाणावर गाजले होते. सदरची घटना १५ जून २०१४ रोजी  मध्यरात्री घडली होती या घटनेत त्यावेळेचे श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी केलेला बारकाईने तपास यामुळे यातील पापा शेखसह १२ आरोपींना नाशिक येथील मोक्का न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती त्याबरोबर एक कोटी ३८ लाख इतका दंड देखील ठोठावला होता अतिशय कुशलतेने तपास करून यातील गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी केलेला तपास पाहता त्या कामाची दखल घेऊन केंद्रीय गृह मंत्रालय नवी दिल्ली यांच्या कडून सध्या नाशिक येथे असलेले लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांना उत्कृष्ट तपास पदक देऊन त्यांचा गौरव केला जाणार आहे. देशातील १५२ जणांना उत्कृष्ट तपास पदक सन्मानपत्र व मानचिन्ह जाहीर झालेले आहे त्यातील महाराष्ट्रातील अकरा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे त्यातील एकमेव नगर जिल्ह्यातील तात्कालीन श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस सुनील कडासने यांचा समावेश आहे यात सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे अति दुर्मिळातील दुर्मिळ खून प्रकरणात मुख्य आरोपीसह १२ आरोपींना त्यांनी केलेल्या तपासा मुळे नाशिक येथील मोक्का न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती या खून प्रकरणानंतर नगर जिल्ह्यात मोठी घबराट पसरली होती. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उपस्थित झाला होता मात्र त्यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करताना अत्यंत बारकाईने व खोलवर तपास करून यातील सर्व दोषींना जास्तीत जास्त शिक्षा कशी मिळेल यासाठी मोठा प्रयत्न केलेला होता नाशिक येथील मोक्का न्यायालयात सुरू होती त्यानंतर न्यायालयाने या मुख्य आरोपीस बारा आरोपींना जन्मठेप व एक कोटी ३८ लाख रुपयांचा दंड सुनावला होता. या तपासात उत्कृष्ट काम केले म्हणून सुनील कडासने यांना केंद्रीय गृह मंत्रालय नवी दिल्ली यांच्या कडून उत्कृष्ट तपास पदक सन्मानचिन्ह व सन्मानपत्र नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. या पुरस्कारामुळे आपण केलेल्या कामाचे मोठे समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here