श्रीरामपूर – तालुक्यात सलग दोन दिवसात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडाकेबाज कारवाई करत दिनांक ११ ऑगस्ट रोजी एका पोलिस हवालदार तर आज दिनांक १२ ऑगस्ट २०२१ रोजी, तालुक्यातील वडाळा महादेव येथील अजितदादा पवार कॉलेजच्या परिसरात असलेल्या ( शिवा ट्रस्ट ), होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे प्राचार्य बापूसाहेब बाळासाहेब हरिषचंद्रे वय वर्ष ५२ राहणार – मानूर तालुका – राहुरी जिल्हा – अहमदनगर व होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या लिपिक भारती बापूसाहेब इथापे वय वर्ष ३४ राहणार- निपाणी वडगाव तालुका श्रीरामपूर या दोघांनी एका विद्यार्थीनीचे बी. एच. एम. एस. पदवीचे पासिंग सर्टिफिकेट व इंटरंशिप पूर्ण केल्याचे सर्टीफिकीट देण्याकरिता १ लाख ४७ हजार ५०० रुपयांची लाच मागितली होती.

यासंदर्भात विद्यार्थिनीच्या पित्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर यांच्याकडे तक्रार केल्याने दिनांक १२ ऑगस्ट २०२१ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने, यांच्या मार्गदर्शनाखाली, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर, पोलीस निरीक्षक दिपक करांडे, पोलीस निरीक्षक श्याम पवरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी, सापळा रचून प्राचार्य बापूसाहेब बाळासाहेब हरिषचंद्रे व लिपिक भारती बापूसाहेब इथापे या दोघांना १ लाख ४७ हजार ५०० रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या यशस्वी कारवाई पो ह. संतोष शिंदे, पो नाईक रमेश चौधरी, पो अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, महिला पोलीस अंमलदार संध्या म्हस्के, चालक पोलीस हवालदार हारुन शेख, पोलीस नाईक राहुल डोळसे आदींनी पार पाडली

श्रीरामपूरातील नावाजलेल्या शिवा ट्रस्ट या शिक्षण संस्थेत लाचलुचपत विभागाने कारवाई केल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली असून. आधीच कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पालकांची लूट थांबविण्यासाठी, शासनाने विशेष प्रयत्न करावे अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here