श्रीरामपूर/प्रतिनिधी :- बेलापूरातून १४ वर्षाची मुलगी गेल्या वीस दिवसापासून गायब असून या विषयांमध्ये आरोपी आयुब शेख याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासामध्ये एलसीबीला सामील करून घेण्यात आलेले आहे. मुलीचा तपास आम्ही लवकरात लवकर लावून आरोपीला कडक शासन करू असे श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी लेखी पत्र दिले व उपविभागीय पोलिस अधिकारी श्री मिटके साहेब यांनी सुमारे दीड तास चाललेल्या रास्ता रोको ला मागे घेण्याचे आवाहन केले. त्यानंतरच बेलापूर येथे महाराणा सामाजिक प्रतिष्ठान व सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने करण्यात आलेला रास्ता रोको मागे घेण्यात आला.

गेल्या 20 दिवसा पूर्वी पळून नेलेल्या मुलीचा अद्याप पर्यंत तपास लागलेला नाही याचे निषेधार्थ महाराणा सामाजिक प्रतिष्ठान व सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आज बेलापूर गावात रास्ता रोको करण्यात आला होता. हा रस्ता रोको सुमारे दीड तास चालला उपविभागीय पोलिस अधिकारी श्री मिटके साहेब यांनी हा रास्ता रोको मागे घेण्याचे आवाहन केले . त्यानंतर हा रास्ता रोको मागे घेण्यात आला यावेळी प्रांताधिकारी अनिल पवार ‘तहसीलदार प्रशांत पाटील, पोलिस निरीक्षक संजय सानप  आदी अधिकारी उपस्थित होते.

या आंदोलनाला विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाअध्यक्ष डॉ. दिलीप शिरसाठ, भाजपचे नेते प्रकाश चित्ते, शिवप्रतिष्ठानचे प्रवीण , जय श्रीराम मंडळाचे भरत , जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, बेलापूर चे उपसरपंच अभिषेक खंडागळे, बेलापूरचे नेते सुनील मुथ्था, भाजपा नेत्या पुष्पाताई हरदास, सौ किरण सोनवणे मार्केट कमिटीचे संचालक सुधीर नवले, महाराणा प्रताप सामाजिक प्रतिष्ठानचे सुहास पवार ,राजेंद्र चव्हाण , संदीप पवार , लक्ष्मण साळुंके , नरहरी पवार ,रामभाऊ पवार ,संतोष चव्हाण , कैलास पवार , नवनाथ पवार,  रवी चव्हाण ,राजु पडवळ ,  विजय पवार , केशव गोविंद ट्रस्ट चे अध्यक्ष बाळासाहेब हरदास आदींसह अनेक मान्यवर नेते उपस्थित होते.

यावेळी बोलताना विश्व हिंदु परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप शिरसाठ, म्हणाले की गेल्या वीस दिवसांपासून पोलिस प्रशासनाने अपहरण झालेल्या मुलीच्या तपासाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असून कुठल्याही स्वरूपात तपास पुढे सरकलेला नाही याचा निषेध करून डॉ. शिरसाठ पुढे म्हणाले की मुलीचा तपास लवकर न लागल्यास या आंदोलनाची व्याप्ती जिल्हाभर वाढवली जाईल असा इशारा डॉ. शिरसाठ यांनी दिला यावेळी बोलताना भाजपा नेते प्रकाश चित्ते म्हणाले लव जिहाद च्या घटनांचा सर्व हिंदू समाजाच्या कुटुंबांमध्ये प्रचार आणि प्रसार करून सर्व हिंदू समाजाला जागृत केले पाहिजे व आपल्या मुलींना लव्ह जिहाद पासुन वाचविले पाहिजे. यापूर्वी भेर्डापूर येथे असा प्रकार घडला होता त्याही वेळेला पोलिसांच्या विरोधात आंदोलन करावे लागले. आंदोलना शिवाय पळवून नेलेल्या मुलींचा तपासच लागत नाही या घटनेचा मी निषेध करतो अशा पळून नेलेल्या मुलींच्या विषयांमध्ये पोलिसांनी वेळीच दखल न घेतल्यास श्रीरामपूरातील सामाजिक संतुलन बिघडल्या शिवाय राहणार नाही असा इशारा  यावेळी त्यांनी दिला.

यावेळी बोलताना सुनील मुथ्था म्हणाले गेल्या वीस दिवसांपासून पोलीस नुसत्या आश्वासनांवर दिवस काढून हिंदू समाजाच्या तोंडाला पाने पुसत आहेत. तपासावर त्यांचे लक्ष केंद्रित नाही पोलिसांनी मुलीचा तपास लवकर न लावल्यास आम्ही सर्व प्रथम बेलापूर बंद करू त्यानंतर श्रीरामपूर बंद करू नंतर जिल्हा बंद करू असे करून आंदोलनाची व्याप्ती वाढवली जाईल असा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला

या रास्ता रोको च्या वेळी सचिन दोडकर ,सौ पुष्पाताई हरदास , शुभम हरदास , आदींची भाषणे झाली .याप्रसंगी घिसाडी समाज बांधव व सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते आभार प्रदर्शनानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here